Pune Division Candidate Disqualification: निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्याने पुणे विभागातील २४ उमेदवार अपात्र; तीन वर्षे निवडणूक लढवता येणार नाही

सांगली, चाकण आणि फुरसुंगी-उरुळी देवाचीतील उमेदवारांवर कारवाई; पुणे विभागात आतापर्यंत ६४ जणांवर अपात्रतेची कारवाई
Candidate Disqualification
Candidate DisqualificationPudhari
Published on
Updated on

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याप्रकरणी पुणे विभागातील २४ उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ही कारवाई केली.

Candidate Disqualification
Pune Salisbury Park Bakery Fine: सॅलिसबरी पार्कमधील दोन बेकऱ्यांवर महापालिकेचा दंडाचा बडगा; अस्वच्छता आणि सांडपाणी सोडल्याने ५० हजारांचा दंड

अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील एक, चाकण नगरपरिषदेतील दहा आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील तेरा उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार निवडणुकीचा खर्च ३० दिवसांच्या विहित कालावधीत सादर केला नव्हता.

Candidate Disqualification
Pune Grand Tour 2027 Road Upgrade Project: ‘पुणे ग्रँड टूर २०२७’साठी रस्त्यांना मिळणार नवा लूक; महापालिकेचा १६७ कोटींचा महामार्ग विकास आराखडा

आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आणि जिल्हा सहआयुक्त, पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर विभागीय आयुक्त कार्यालयात १३ जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र, संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने त्यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Candidate Disqualification
Katraj Kondhwa Road Project Delay: कात्रज-कोंढवा रस्त्याची प्रतीक्षा कायम; जूनची डेडलाईन हुकली, आता मार्चचे नवे आश्वासन

यापूर्वीही पुणे महानगरपालिकेतील २२, पंढरपूर नगरपरिषदेतील १५ आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील तीन अशा ४० उमेदवारांवर याच कारणामुळे तीन वर्षांची अपात्रता लागू करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत पुणे विभागातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांतील एकूण ६४ उमेदवारांवर निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news