Pune Salisbury Park Bakery Fine: सॅलिसबरी पार्कमधील दोन बेकऱ्यांवर महापालिकेचा दंडाचा बडगा; अस्वच्छता आणि सांडपाणी सोडल्याने ५० हजारांचा दंड

गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरीवर कारवाई; सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा महापालिकेचा इशारा
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणे तसेच सांडपाणी अनधिकृतपणे ड्रेनेजलाइन आणि नाल्यात सोडल्याप्रकरणी महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने सॅलिसबरी पार्क परिसरातील दोन बेकरींवर एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरी या दोन्ही आस्थापनांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली.

Pune Municipal Corporation
Pune Grand Tour 2027 Road Upgrade Project: ‘पुणे ग्रँड टूर २०२७’साठी रस्त्यांना मिळणार नवा लूक; महापालिकेचा १६७ कोटींचा महामार्ग विकास आराखडा

कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मध्ये बुधवारी संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सॅलिसबरी पार्कमधील गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरीची पाहणी करण्यात आली. तपासणीवेळी दोन्ही आस्थापनांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली जात असल्याचे, तसेच सांडपाणी थेट ड्रेनेजलाईन आणि नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महापालिकेने तातडीने दंडात्मक कारवाई करत दोन्ही बेकरींकडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड वसूल केला.

Pune Municipal Corporation
Katraj Kondhwa Road Project Delay: कात्रज-कोंढवा रस्त्याची प्रतीक्षा कायम; जूनची डेडलाईन हुकली, आता मार्चचे नवे आश्वासन

ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संतोष वारुळे, परिमंडळ क्रमांक ५ चे उपआयुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर तसेच आरोग्य निरीक्षक अमोल लांडगे, तौसिफ देशपांडे आणि चंद्रवदन गायकवाड यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई केली.

Pune Municipal Corporation
Daund Milk Adulteration Case Investigation: दूध भेसळ रॅकेटचे धागेदोरे दौंडपर्यंत? माळवाडीतील दूध संकलन केंद्र रडारवर

स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आणि नागरिकांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिक तसेच व्यावसायिकांनी स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news