पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाली आहे. वाहनातील तापमान नियंत्रित करणे, फोन कॉल करणे आणि मनाजोगते गाणे लावण्यासाठी आता फक्त आदेश द्यावा लागणार आहे. एआय एजंटने सक्षम असलेली प्रणाली विनाअडथळा तुमचा शब्द पाळण्यास तत्पर राहील.
केरळातील कोची येथे आयोजित कार्यक्रमात स्कोडा इंडियाने नवीन कुशाक कार सादर केली. या कारमध्ये एआयचा वापर करून मनोरंजन अधिक समृद्ध करण्यात आले आहे. प्रगत डिजिटल आर्किटेक्चरवर आधारित ही नवीन सिस्टिम कार्यक्षमता, कनेक्टिव्हिटी आणि सहजसोप्या संवादाच्या आधारे काम करते. या प्रणालीसाठी गुगल ऑटोमोटिव्ह एआय एजंटचा वापर करण्यात आला आहे. हा एआय एजंट जेमिनीला वाहनामध्ये आणतो. त्यामुळे बातम्या आणि ट्रेंड्ससारखी रिअल टाइम माहिती थेट वाहनात उपलब्ध होते.
याशिवाय आवडीची गाणी ऐकण्यासाठी, कॉल करण्यासाठी आणि वाहनातील तापमान बदलण्यासाठी यंत्राला हात लावण्याची गरज संपली आहे. नवीन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, रेअर सीट मसाज फंक्शन यात देण्यात आले आहे. अशा पद्धतीच्या वाहनात प्रथमच अशा तंत्राचा वापर होत आहे. खराब रस्त्यांवर वेगाने वाहन गेल्यास वाहनाची स्थिरता कायम राहते. त्यासाठी 188 एमएम ग््रााउंड क्लीअरन्स देण्यात आली आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे बँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, युरोपियन तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे हे आमचे ध्येय आहे. आज शहरे आणि गावांच्या सीमा धूसर होत आहेत. ग््रााहकांच्या बदलत्या आवडीनिवडींची पूर्तता करणारी उत्पादने सादर करण्यावर भर राहील. खऱ्या स्वयंचलित गाड्यांची श्रेणी सादर करण्याचा आमचा वारसा पुढे नेत आहोत.