Siya Goyal Snapchat Chat Pudhari
पुणे

Siya Goyal Snapchat Chat: 'हे लग्न कधीच होणार नव्हतं...' सिया गोयलचे प्रायव्हेट चॅट व्हायरल; तपासाला धक्कादायक वळण

Siya Goyal Snapchat Chat: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात सिया गोयलचे एक कथित स्नॅपचॅट चॅट समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Siya Goyal Snapchat Chat: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आल्याचा दावा केला जात आहे. तपास यंत्रणांना मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिच्या एका मैत्रिणीमधील कथित स्नॅपचॅट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या चॅटमधील काही मेसेजमुळे हत्या पूर्वनियोजित होती का, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हे चॅट अधिकृत आहेत का हे अद्याप कळलेलं नाही.

समोर आलेल्या कथित स्क्रीनशॉटनुसार, 24 ते 26 मेदरम्यान सिया आणि तिच्या मैत्रिणीमध्ये संभाषण झाले होते. त्यामध्ये सियाने मैत्रिणीकडे आधार कार्डच्या पुढील आणि मागील बाजूचा फोटो मागितल्याचे दिसते. तसेच, "त्या लग्नाच्या तिकिटांसाठी पाठव... जे लग्न कधीच होणार नव्हतं," असा मेसेजही असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर मैत्रिणीने "व्हॉट्सअॅपवर पाठवलं आहे," असे उत्तर दिल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसते.

या कथित संभाषणानंतर तपास यंत्रणांनी फ्लाइट तिकिटांच्या बुकिंगकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लग्नाच्या तयारीचा आणि प्रवासाचा आभास निर्माण करून कोणाचाही संशय येऊ नये, यासाठी हा सगळा बनाव रचला गेला होता का, याचा तपास सुरू आहे.

याशिवाय, हत्या झाल्यानंतर तपासाची दिशाभूल करण्यासाठी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांनी आधीच काही रणनीती आखली होती का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि सोशल मीडिया संवाद यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.

या कथित स्नॅपचॅट चॅटची सत्यता आणि तिचा हत्याकांडाशी थेट संबंध असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सायबर आणि फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतरच या चॅटमधील दाव्यांबाबत निश्चित निष्कर्ष काढला जाईल. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत या माहितीकडे केवळ कथित डिजिटल पुरावा म्हणूनच पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT