पुणे

‘टीडीआरप्रकरणी एसआयटी स्थापन करावी : चेतन बेंद्रे

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची कॅगमार्फत चौकशी करण्यात यावी. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात टीडीआर घोटाळ्याचे स्पष्टीकरण दिलेलेेे नाही. सनदी अधिकार्‍यांची (एसआयटी) टीम बनवून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सोमवारी (दि. 18) आयोजित पत्रकार परिषदेत केली. महापालिकेची अनेक ठिकाणी समावेशक आरक्षणाखाली (अकोमोडेशन रिझर्वेशन) बांधकामे सुरू आहेत.

सर्व प्रकरणांत मोबदला देताना 26 हजार 620 रुपये प्रति चौरस मीटर दरानुसार देणे बंधनकारक असताना नियमांचा विपर्यास करून या आरक्षणाबाबत 65 हजार 69 रुपये प्रति चौरस मीटर दर का काढण्यात आला? शहरातील विविध विषयांवर 4 आमदार विधी मंडळात चर्चा करत आहेत, मग टीडीआरबाबत गप्प का? असा सवालबेंद्रे यांनी उपस्थित केला. यावेळी पक्षाचे प्रवक्ता प्रकाश हगवणे, महिला अध्यक्षा सरोज कदम, अशोक लांडगे व डॉ. प्रशांत कोळवले आदी उपस्थित होते.

बेंद्रे म्हणाले, आजच्या बाजारमुल्यानुसार जादाच्या टीडीआरची किंमत तब्बल 1 हजार 511 कोटी रुपये आहे. त्यामध्ये तब्बल 6 हजार मोहल्ला क्लिनिक तयार झाले असते किंवा 4 ते 5 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल झाले असते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका विनाकारण पुढे ढकलण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. तसेच नगररचना विकास, बांधकाम परवाना आदी विभागातील अधिकार्‍यांची एसआयटी मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करावे. भूखंड मालकांना दिलेला टी.डी. आर रद्द करण्यात यावा, अशी मागणी देखील बेंद्रे यांनी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT