Sinhagad Institutes Pudhari
पुणे

Sinhgad Education Society Schools: सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या १३ शाळांवर प्रशासक नियुक्त; शिक्षणाधिकाऱ्यांकडे कारभार

मुंबई उच्च न्यायालयातील अवमान याचिकेच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय; माध्यमिकच्या ९ आणि प्राथमिकच्या ४ शाळांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या १३ शाळांवर प्रशासक म्हणून प्राथमिक तसेच माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील ९ आणि प्राथमिक विभागातील ४, अशा १३ शाळांचा कारभार आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संबंधित माहिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका क्रमांक ३४९/२०२६ दाखल आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने दि. १३ नोव्हेंबर रोजी प्रशासकनियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासक व सल्लागार समिती सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यावर दि. १८ नोव्हेंबर रोजी शासनाने मान्यता दिली.

महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था (व्यवस्थापन) अधिनियम, १९७६ मधील कलम ४ (१) व ५ (१) नुसार ही नियुक्ती करण्यात येत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील ९ शाळांसाठी प्रशासक म्हणून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सल्लागार म्हणून उपशिक्षणाधिकारी छाया महिंद्रकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे यांचीही सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्राथमिक विभागातील ४ शाळांसाठी प्रशासक म्हणून जिल्हा परिषद पुणेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून उपशिक्षणाधिकारी संजय काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमीन यांचीही सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या आहेत शाळा

  • सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, आंबेगाव

  • सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव

  • सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा

  • सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नऱ्हे, जि. पुणे

  • सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आंबेगाव, जि. पुणे

  • सिंहगड पब्लिक स्कूल, खुसगाव, लोणावळा, जि. पुणे

  • आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, वारजे, जि. पुणे

  • स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, कर्वेनगर, एरंडवणे, जि. पुणे

  • सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा, जि. पुणे

  • सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, आंबेगाव स. नं. १०/१, आंबेगाव बु., पुणे

  • आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आदित्य गार्डन सिटी, वारजे, पुणे

  • स्प्रिंगडेल स्कूल, १९/१५ श्रीम. खिलार मार्ग, एरंडवणे, पुणे

  • सिंहगड सिटी प्रायमरी स्कूल, पुणे महानगरपालिका, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT