पुणे

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी अन् गुरुजी तालीमचा यंदाही थरार

अमृता चौगुले

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अभिनेते प्रवीण तरडे, ईशान्य महेश्वरी, भारतीय क्रिकेटर केदार जाधव, डीजे तपेश्वरी, डीजे अखिल तालरेजा ही कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यांनी एकत्र येत गतवर्षापासून भव्य असा सार्वजनिक दहीहंडी महोत्सव सुरू केला आहे. लक्ष्मी रस्त्यावर गुरुजी तालीम गणपती चौकात हा दहीहंडी कार्यक्रम होतो. गतवर्षीच्या पहिल्याच वर्षी तब्बल 50 हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती. या वर्षी या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जास्तीत जास्त युवावर्गाने या दहीहंडी उत्सवासाठी उपस्थितीत राहावे, असे आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT