पुणे

श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा : अयोध्येत घुमणार पुणेकरांचा शंखनाद!

Laxman Dhenge
कसबा पेठ : अयोध्येत प्रभू  22 जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यात शंखनाद करण्यासाठी पुण्यातील केशव शंखनाद पथकाला राममंदिर न्यासकडून निमंत्रण मिळाले आहे. या पवित्र कार्यात पुण्याच्या आणखी एका योगदानाची नोंद होणार आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सध्या या ठिकाणी सुरू आहे. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणले जात आहेत.
या सोहळ्यात पुण्यातील केशव शंखनाद पथकातील 111 वादकांना अयोध्येत शंखनाद करण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनू गणेशोत्सव मंडळ, भाऊसाहेब रंगारी गणपती व शारदीय नवरात्री उत्सवात श्री चतुःशृंगी मंदिरात महाआरतीचा मान या पथकाला मिळाला आहे.

केशव शंखनाद पथकाबद्दल…

2017 मध्ये गणेशोत्सवात शंखनाद करण्याच्या उद्देशाने अवघ्या पाच-सहा  वादकांपासून सुरू झालेल्या या पथकातील सदस्यांची संख्या आता चारशेवर पोहचली आहे. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर परिसरात या पथकाचा शनिवारी-रविवारी सराव सुरू असतो. सुरुवातीला नागरिकांना शंखनाद नवीन असल्याने त्याबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र, हळूहळू शंखध्वनीने वेगवेगळे ताल, स्वर वाजत गेले आणि गणेश मिरवणुकीत या पथकाचे आकर्षण वाढत गेले.
आमच्या शंखनाद पथकात 50 ते 87  वयोगटाच्या महिला अधिक आहेत. हा क्षण आमच्यासाठी भाग्याचा असून, तो श्रीरामाचा आशीर्वाद मिळाल्याची आमची भावना आहे.
    – नितीन महाजन, अध्यक्ष, केशव शंखनाद पथक, पुणे
हेही वाचा
SCROLL FOR NEXT