वडणगेतील प्रेरणला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक | पुढारी

वडणगेतील प्रेरणला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक

वडणगे, पुढारी वृत्तसेवा : वडणगे येथील राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रेरणा आळवेकरचा सहभाग असलेल्या महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला बॅडमिंटन संघाने सुवर्णपदक पटकावले. तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या ७६ व्या आंतरराज्य-आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यानंतर पार पडलेल्या ८५व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरी गटात प्रेरणाने मृण्मयी देशपांडेच्या साथीने कास्यपदक मिळवले.

प्रेरणाच्या बॅडमिंटन करियरला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आर्थिक सहकार्य, बाळासाहेब यादव यांचे प्रोत्साहन मिळाले. प्रशिक्षक तन्मय करमरकर व हर्षल तेलवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वर्षादेवी नालगोंडा, चंद्रशेखर सोवनी, विनोद भोसले यांचे सहकार्य मिळाले.

Back to top button