पुणे

धक्कादायक! दारूसाठी पैसे दिले नाहीत.. त्याने आईलाच संपवलं..!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दारूसाठी पैसे न देणार्‍या वृद्ध आईचा 30 वर्षीय मुलाने आणि नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध आईचा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (दि.15) मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

मंगल मोहन नेटके (वय 60, रा. कामराजनगर, येरवडा) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बहिणीच्या मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मंगल नेटके या कामराजनगरमध्ये मुलासोबत राहण्यास होत्या. त्या घरगुती कामे करत होत्या. तसेच, एका कार्यालयातदेखील साफसफाईचे काम करत होत्या. त्या कार्यालयाकडून त्यांचा पगार झाला होता. त्याचे पैसे त्यांच्याकडे होते. ही बाब मुलगा मयूर याला समजली. दरम्यान, मुलगा मयूर याला दारूचे व्यसन आहे. तर, अल्पवयीन मुलगा नातेवाईक आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT