शिवणे-खडकवासला-धायरी (पार्ट) प्रभागात (क्र. ३३) प्रमुख पक्षांत तुल्यबळ दावेदार आहेत. नव्याने समाविष्ट केलेल्या खडकवासला, शिवणे, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर, कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे येथे प्रथमच महापालिका निवडणुका होत असल्याने या प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. त्यामुळे मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार? याबाबत उत्सुकता आहे.(Latest Pune News)
महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या शिवणे, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, उर्वरित धायरी, कोपरे, उत्तमनगर आणि कोंढवे धावडे गावांचा या प्रभागात समावेश करण्यात आला आहे. या प्रभागात एकूण मतदारसंख्या ८७,८१४ इतकी आहे. या प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेस, मनसे आणि आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवणार की नाही, याचा विचार न करता इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. आता लढायचे हाच पवित्रा सर्वच इच्छुकांनी घेतल्याने मतविभाजन मोठ्या प्रमाणात होईल. २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, शिवणेसह ११ गावांच्या प्रभागाच्या निवडणुकीत धायरी येथील भाजपच्या अश्विनी पोकळे ह्या विजयी झाल्या होत्या.
आता भाजपकडून माजी नगरसेविका पोकळे यांचे पती किशोर पोकळे, संदीप पोकळे, बापूसाहेब पोकळे, नांदेड मंडल अध्यक्ष रूपेश घुले पाटील, रश्मी घुले पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव दत्तात्रय कोल्हे, धनश्री कोल्हे, सुभाष नाणेकर, किरण हगवणे, काजल हगवणे, अनिल मते, अशोक मते, रमेश गायकवाड,
मनीषा मोरे, उमेश सरपाटील, निखिल धावडे, सचिन विष्णू दांगट, ममता दांगट, गणेश वांजळे, संकेत जाधव यांच्यासह नांदेड सिटीचे संचालक नरसिंह लगड आणि खडकवासलाचे माजी सरपंच संतोष मते हेही भाजपकडून इच्छुक आहेत. अनुसूचित जाती आरक्षण पडले; तर फुलाबाई कदम, सायली भोसले, अभिषेक कांबळे आदी भाजपकडून इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राहुल पोकळे, खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते, सागर कोल्हे, विकास कामठे, अविनाश लगड आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे आणि माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण आणि त्यांचे पुत्र अनिकेत चव्हाण हे प्रमुख दावेदार आहेत. तसेच राहुल मुले पाटील, नरेंद्र हगवणे, त्रिंबक मोकाशी, अतुल धावडे, स्नेहल धावडे, अतुल दांगट, पूनम मते, हनुमंत | शिवर, तृप्ती पोकळे, कुणाल पोकळे, आनंद मते हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हवेली पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब मोकाशी, किरकटवाडीचे माजी सरपंच गोकूळ करंजावणे, संदीप मते, दत्तानाना रायकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जगदीश धुमाळ, संतोष शेलार, काँग्रेसकडून मिलिंद पोकळे, अतुल कारले, उमेश कोकरे, मनसेकडून विजय मते, शिवाजी मते, सोनाली पोकळे, विजय इंगळे, रमेश करंजावणे, जगदीश वाल्हेकर, महादेव मते, अतुल मत हे इच्छुक आहेत. नितीन धावडे, उमेश कारले, राहुल मते, संजय धिवार यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, पक्ष निश्चित केला नाही.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या खडकवासला मतदारसंघाचा हा भाग गल्या चार विधानसभांपासून भाजपकडे गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनाही या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
ग्रामीण आणि निमशहरी असा संमिश्र भाग या प्रभागात आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिव्येभेची ताकद प्रभागात चांगली आहे. तसेच काँग्रेस, मनसे, आम आदमी पक्षाची ताकदही काही भागात आहे. याशिवाय इतर पक्ष व अपक्ष म्हणून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. आमदार भीमराव तापकीर यांचा प्रभाव या प्रभागावर आहे. सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपात आहे. खडकवासला विधानसभा निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपात जोरदार हालचाली सुरू आहेत. तर काही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. ऐनवेळेस पक्षांतरही होण्याची चिन्हं या प्रभागात आहेत