

पाटस : पाटस (ता. दौंड) यात्रेवर गुन्हेगारीचे सावट असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असतानाच यवत पोलिसांनी बुधवारी (दि. ५) रात्री १२.१५ च्या सुमारास सराईत आरोपींना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वेढा घालत पकडले.(Latest Pune News)
पोलिसांना आरोपींच्या हालचालींची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी आरोपींनी आरोपींनी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहनातून (एमएच ४२ एच ६१२४) कुसेगाव दिशेने वेगाने पळ काढला, पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर आरोपींची गाडी कुसेगाव येथे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ वेढा घालून आरोपींना ताब्यात घेतले.
या दरम्यान आरोपींना मदत करण्यासाठी मागून आलेली दुसरी चारचाकी (एमएच १४ एफसी ०६४६) देखील पोलिसांनी जप्त केली असून त्यातील तरुण पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणानंतर गावात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने पाटस व वरवंड परिसरात सतर्कता ठेवली होती. यात्रेत कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
यवत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून यात्रेदरम्यान शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
--------
फोटो ओळ : कुसेगाव (ता. दौंड) येथे यवत पोलिसांनी आरोपींना पकडताना आरोपींच्या ताब्यातील वाहन पलटी होऊन झालेला अपघात.
-----------