पुणे

शिवसेना शिंदेंचीच! ..निकालाचे शहरात जंगी स्वागत

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सारसबागेजवळील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. तत्पूर्वी, महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली.  बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी जाहीर केला.
यामध्ये शिवसेनेतील सर्व आमदार पात्र असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेले सरकार हे पूर्णपणे संविधानिक व कायद्याने बनलेले सरकार वैध असल्याचे मान्य केले.  मध्यवर्ती कार्यालय ते बाळासाहेब ठाकरे व्यंग्यचित्रकार कलादालन इथपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच महिला पदाधिकार्‍यांनी फुगडी खेळत आनंद साजरा केला.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे म्हणाले, हा ऐतिहासिक निकाल असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्त्वाने स्थापन झालेले सरकार आहे.  न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल. या वेळी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, अंगीकृत संघटना व शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT