Women Harassment Case Pudhari
पुणे

Shirur Crime News: विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

शिरूर तालुक्यातील आंबळे येथील घटना; मुलगा होत नसल्याच्या कारणावरून धमकावल्याची विवाहितेची फिर्याद.

पुढारी वृत्तसेवा

न्हावरे: आंबळे (ता. शिरूर) येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून पैशांची मागणी केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गायत्री विकी पवार (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विकी रामदास पवार (वय २८), सासू मीना रामदास पवार (वय ५५), दीर किरण रामदास पवार (वय ३३), जाऊ शिवानी किरण पवार (वय २७) आणि नणंद निलम विजय साळुंके (वय ३०, सर्व रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गेली ६ वर्षे सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे गायत्री पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून मुलगी हिसकावून घेण्याची तसेच पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिली जात होती.

पतीने नवीन चारचाकी वाहन घेतल्याने त्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच पतीविरुद्ध यापूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा राग मनात धरून फिर्यादीला एका मुलीला भेटून तिला मारहाण करण्यास सांगण्यात आले.

मात्र, गायत्री पवार यांनी नकार दिल्यानंतर त्यांची मुलगी शर्वरी हिला हिसकावून घेऊन त्यांना घराबाहेर काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT