पुणे

Shirur Lok Sabha : उमेदवार ठरेना! आढळरावांसह कंद, लांडे यांची नावे चर्चेत

Laxman Dhenge

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदीप कंद यांचाही विचार करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. महायुतीचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अजूनही सुटलेला नाही. महायुतीमध्येही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार हे निश्चित झाले आहे, परंतु या जागेवरील उमेदवार काही ठरायला तयार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघातील पक्षाचे आमदार आणि प्रमुख नेत्यांची रविवारी मुंबईमध्ये बैठक घेतली, त्यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा झाली असल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रमुख नेत्यांनी या बैठकीत पक्षाचा उमेदवार द्यावा, असा आग्रहही धरल्याचे समजते. आता बुधवारी (दि. 20) अजित पवार शिरूर मतदारसंघाचा दौरा करणार आहेत, त्या वेळी ते प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून, अंदाज घेऊन उमेदवाराचे नाव जाहीर करतील असे समजते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT