शिर्सूफळ: बारामती तालुक्यातील शिर्सूफळ-पारवडी हद्दीतील शिर्सूफळ-भिगवण मार्गावरील पुलाला मोठी भगदाडे पडल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग््राामस्थांत तीव नाराजी व्यक्त होत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुपे आणि पालखी महामार्गाकडून भिगवणकडे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच बारामती ॲग््राो कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठीही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे हा रस्ता कायम वर्दळीचा असतो.
गेल्या वर्षी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी विविध ठिकाणी पुलांची कामे करण्यात आली होती. मात्र, कामे अर्धवट अवस्थेतच बंद पडल्याने पुलाची स्थिती अधिकच कमकुवत झाली. दुर्लक्षामुळे पुलाच्या मधोमध मोठी भगदाडे पडली असून, सध्या नागरिक जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करत आहेत. परिस्थिती गंभीर बनल्याने हा मार्ग लवकरच वाहतुकीस बंद करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुंदीकरणाची कामे सुरू करून ती अर्धवट सोडल्याने पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बांधकाम विभागाने वेळेत दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘या समस्येकडे प्रशासन लक्ष देत नाही. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. तातडीने पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा होणाऱ्या अपघातास प्रशासन जबाबदार राहील,’ असा इशारा ग््राामस्थ संजय आटोळे यांनी दिला.