Bjp vs Ncp Pudhari
पुणे

Shikrapur ZP Election 2026: मोनिका हरगुडे यांची रणनीती; भाजपला मोठा धक्का

23 हजार मतांनी दणदणीत विजय; सणसवाडी गणात अपक्ष उमेदवाराचा अनपेक्षित पराभव

पुढारी वृत्तसेवा

शिक्रापूर: औद्योगिक वसाहत, व्यापारी केंद्र व उत्तम रहिवासी विभाग अशी शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटाची ओळख आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची लढत रंजक व आर्थिक उलाढालीची होईल, अशीच चर्चा होती. मात्र, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मोनिका नवनाथ हरगुडे यांनी डाव टाकला आणि भाजप गलितगात्र झाली.

निवडणूकपूर्वी हारगुडे यांनी भाजपचे आव्हान संपुष्टात आणले. त्यांच्या या रणनीतीने भाजप पुरस्कृत सीमा कळमकर यांचे फक्त नावाला आव्हान उरले होते. या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला या गटात नामुष्कीला सामोरे जावे लागले. कारण भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या कुसुम खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मोनिका हरगुडे यांचा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला.

यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे यांनी भाजपने दिलेली उमेदवारीची ऑफर नाकारत पक्षाशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील व माऊली कटके यांनी मध्यस्थी केल्यामुळे मांढरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळीच शिक्रापूर गटातील चित्र स्पष्ट होऊन निवडणूक एकतर्फी झाली.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक अर्ज राहिलेल्या अपक्ष सीमा कळमकर यांना भाजपाला पुरस्कृत करावे लागले. येथेही कळमकर यांचे राष्ट्रवादीसोबत संबंध हरगुडे यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत हरगुडे यांनी 23 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

शिक्रापूर गणात राष्ट्रवादीने विजय मिळवला. रामभाऊ सासवडे यांनी भाजपाच्या पंढाभाऊ गायकवाड यांचा पराभव केला. मात्र, राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेवर मोठा विजय मिळालेला असताना सणसवाडी गणात त्यांच्या उमेदवार मनीषा संपत गव्हाणे यांचा अपक्ष उमेदवार कोमल ढेरंगे यांनी 1100 मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून सर्व सूत्रे राष्ट्रवादी काँग््रेासने हलविल्याची चर्चा आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी पक्षालाच अडचणीत आणल्याचे शिक्रापूर गटात आता चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT