Shikrapur Water Leakage Pudhari
पुणे

Shikrapur Water Leakage: शिक्रापूरमध्ये पाणी गळतीचा मोठा प्रश्न; हजारो लिटर पाणी वाया

उन्हाळ्यात टंचाई वाढलेली असताना जलवाहिनी फुटल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

शिक्रापूर: सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव झाल्या असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना शिक्रापूर ग््राामपंचायतीच्या जलपुरवठा योजनेच्या जलवाहिनीमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नागरिकांना नेहमी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असताना शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून शुद्ध पाण्याची पेयजल योजना उभारण्यात आली आहे.

गावातील काही भागात या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी कोंढापुरी येथील तलावातून पाणी आणत येथून जलवाहिनी करण्यात आली. सध्या शिक्रापूर येथील काही ठिकाणी नागरिकांना पाणीटंचाई जाणवू लागलेली असताना ही जलवाहिनी कासारी फाटा परिसरात फुटलेली आहे.

त्यामुळे येथून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने ऐन दुष्काळात पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाने यावर लक्ष देऊन ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करत ऐन पाणीटंचाईमध्ये वाया जाणारे पाणी बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

शिक्रापूर येथील पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाली असून, ग््राामपंचायतीमार्फत पाहणी केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र देऊन याची दुरुस्ती केली जाईल.
शिवाजी शिंदे, ग््राामपंचायत अधिकारी, शिक्रापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT