AI Oral Cancer Detection: एआय तंत्रज्ञानामुळे मुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान शक्य

पुण्यातील तपासणी मोहिमेत 230 पैकी 105 जणांमध्ये पूर्व-कर्करोगीय लक्षणे आढळली
AI
AIPudhari
Published on
Updated on

पुणे: वैद्यकीय क्षेत्रामध्ये तपासणी आणि उपचारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यामुळे कमी वेळेत अचूक निदान करणे शक्य झाले आहे. एआयच्या मदतीने मुखाच्या कर्करोगाचे निदानही लवकर होत असल्याचे विशेष आरोग्य तपासणी मोहिमेतून सिद्ध झाले आहे.

AI
Sugarcane Control Order 2026: ऊस नियंत्रण आदेश 2026 वरून शेतकरी आक्रमक; मोठ्या आंदोलनाचा इशारा

खासगी संस्थेतर्फे चालकांसाठी आयोजित केलेल्या या मोहिमेत तपासणी झालेल्या 230 जणांपैकी तब्बल 105 जणांमध्ये मुखाच्या कर्करोगाची शक्यता अधोरेखित करणाऱ्या जखमा किंवा विकार आढळून आले. यासाठी स्मार्टफोन- आधारित एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तोंडातील जखमा आणि संशयास्पद बदलांचे परीक्षण करण्यात आले. तज्ज्ञांच्या मते, अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतानाही पूर्व- कर्करोगीय विकार आढळले.

AI
Pune Extortion Case: कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाला खंडणीचा धाक; 15 लाख उकळल्याचा आरोप

एआय तंत्रज्ञानामुळे तोंडातील प्रतिमांचे तत्काळ विश्लेषण करता येते. त्यामुळे संशयास्पद जखमा अधिक अचूक आणि वेगाने ओळखता येतात. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान दुर्गम भागात किंवा मोठ्या प्रमाणातील तपासणी मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकते.

डॉ. अमृता राव, मुख कर्करोग तपासणी तज्ज्ञ

तपासणीत ल्युकोप्लाकिया, टोबॅको पाऊच केराटोसिस आणि ओरल सबम्युकस फायबोसिससारखे पूर्व- कर्करोगीय विकार आढळले. तपासणी झालेल्या बहुतांश व्यक्तींना अनेक वर्षांपासून तंबाखू सेवनाची सवय होती. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केवळ तोंडातील विविध भागांचे छायाचित्र घेतले जाते. त्यानंतर एआय प्रणाली त्या प्रतिमांचे विश्लेषण करून संशयास्पद भाग ओळखते आणि पुढील तपासणीची गरज आहे की नाही, याबाबत सूचना देते. कमी वेळात मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यासाठी हे तंत्रज्ञान प्रभावी ठरते.

डॉ. प्राची हेंद्रे- म्हेत्रस, मुख कर्करोग तपासणी तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news