शेळगाव: शेळगाव(ता.इंदापूर)येथील गावठाणातील मनीषा मल्हारी खोमणे (वय 35) या महिलेचा मंगळवारी (दि 23) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास पती मल्हारी उर्फ बापू खोमणे यांनी डोक्यात जबर प्रहार करून खून केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मयत महिला अंघोळीसाठी जात असताना संशयित आरोपी पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने पाठीमागून तिच्या डोक्यामध्ये जोराचा प्रहार केल्याने ती जागीच मृत्यूमुखी पडली. आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्या वर वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे,पोलीस उपनिरीक्षक रथीलाल चौधर, पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे, पोलीस कर्मचारी गुलाब पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. संशयीत आरोपी पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याला शोधण्यासाठी वालचंदनगर पोलिसांची पथके तातडीने माळेगाव,जेजुरी नातेपुते सह अन्य दिशेने मार्गस्थ झाली आहेत.