

पुणे : राज्यशासनाने मंडई मेट्रोस्थानकाचे नाव बदलून 'महात्मा फुले मंडई' असे नामकरण केल्यामुळे सोमवारी (दि. 22) मनसेकडून येथेच जल्लोष करण्यात आला.
महात्मा फुले मंडई येथे सुरू झालेल्या मेट्रोस्थानकाला पूर्वी 'मंडई मेट्राेस्थानक' हे नाव देण्यात आले होते. त्यामुळे हे नाव बदलून 'महात्मा फुले मंडई मेट्रोस्थानक' असे नाव करण्याची मनसेची मागणी होती. ती पूर्ण केल्यामुळे सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास 'महात्मा फुले मंडई मेट्रोस्थानक' येथे मनसेडून जल्लोष करण्यात आला.
या वेळी फटाके फोडत, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी वसंत खुटवड, रवी सहाणे, संग्राम तळेकर, सारंग सराफ, अमित चौधरी, आरती सहाणे, राजगुरू, मनीष शितोळे आदी उपस्थित होते.