पुणे

शरद मोहोळ खून प्रकरण : सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने शुक्रवारी (दि. 19) त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित ऊर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्या (मोक्का)नुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र, गुन्हे शाखेचे पथक मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेत आहेत. तो सापडल्यानंतर सर्व आरोपींना मोक्का लावला जाणार आहे. तोपर्यंत अर्ज प्रलंबित ठेवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणातील विनायक गव्हाणकर याने पाठीत वेदना होत असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेसाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. मोहोळच्या खुनाचा तपास करताना आणखी तीन गुन्हे उघडकीस आले असून, पौड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या खूनप्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT