शनिवारवाडा हा राष्ट्रीय वारसा हक्क स्थळांत समाविष्ट असल्याने राष्ट्रीय भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. देखभाल, सुरक्षा आणि डागडुजीची जबाबदारी वाच विभागाची आहे. पूर्वी या ठिकाणी प्रवेशद्वारावर तिकीट काढून सहजतेने आत जाता येत होते. त्यानंतर वाढत्या गर्दीचा अंदाज घेत सुरक्षायंत्रणा कडक करण्यात आली.
प्रवेशद्वारातच स्टीलचे बॅरिकेड, तपासणी यंत्रणा बसविण्यात आली. तिथपर्यंत सर्वकाही व्यवस्थित होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी क्यूआर कोडवरून तिकीट विक्री सुरू झाली. त्यासाठी पर्यटकांना द्रविडी प्राणायाम करावा लागत आहे.
या ठिकाणी सुरक्षा हा मुख्य हेतू आहे. त्या कारणास्तव आम्ही अशी यंत्रणा तयार केली आहे. जेव्हा जेव्हा पर्यटकांची संख्या वाढते तेवहा आम्ही तिकीट काढून घेट प्रवेशाची सोय केली आहे. मात्र, ही सूट फक्त शनिवार, रॉववारी आहे. या दोन दिवसांमध्ये जास्त गर्दी असते.
प्रवेशद्वारावर पाच ते सहा सुरक्षारक्षक आहेत. मात्र, त्यांना त्यांचे मूळ काम सोडून तिकीट काढताना ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, हेच काम करावे लागते. त्यामुळे इथे गेल्यावर पर्यटक सुरक्षारक्षकांभोवती गर्दी करतात. तो रक्षक अर्जात नेमके काय भरायचे ते सांगतो. यासाठी एका पर्यटकाला किमान २० मिनिटे लागतात
शनिवारवाड्याचे वय : २९२ वर्षे
१० जानेवारी १७३० रोजी पायाभरणी
२२ जानेवारी १७३२ रोजी झाले
बांधकाम साग जुत्ररच्या जंगलातून, दगड चिंचवडच्या खाणीतून, चुना जेजुरीच्या चुनखडीतून आणला.
एकूण खर्च १६ हजार ११० रुपये.
पुढे तटबंदीच्या भिंती, बुरुज आणि दरवाजे यांसह अनेक नवीन इमारतींची भर पडत गेली.
कोर्ट हॉल, इतर इमारती, कारंजे, जलाशय, तटबंदीचा परीष, पाथ प्रवेशद्वार आणि नऊ बुरुज आहेत.
ज्यात मूळ इमारतीच्या पायासह उधान संकुल आहे.
जून १८१८ मध्ये ब्रिटिशांचा ताबा.
२७ फेब्रुवारी १८२८ रोजी मोठ्या आगीत बाडा जळून नष्ट झाला.
सात दिवस आग विझली नव्हती.