IND vs ZIM : भारताचा मालिका विजय

चौथ्या सामन्यात झिम्बाब्वेचा 10 विकेट्सने पराभव करत मालिका खिशात
IND vs ZIM
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालने नाबाद 165 धावांची भागीदारी करत सामना जिंकून दिला.Pudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (दि.१३) खेळवण्यात आला. हा सामना भारताने 10 विकेट्सनी जिंकून मालिकेवर आपला कब्जा केला आहे. या सामन्यात गिल आणि जैस्वाल यांच्यामध्ये 156 धावांची भागीदारी झाली. सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमान संघाने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघ या मालिकेत 3-१ ने आघाडी मिळवून आपला नंबर 'वन'चा ताज राखला आहे. १५३ धावांचे लक्ष्‍य पूर्ण करण्यासाठी 16 षटके घेतली.

या सामन्यामध्ये भारताने एकही गडी न गमावता सामना जिंकला. दरम्यान सामन्यात तुफानी फटकेबाजी करत यशस्वी जैस्वालने 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 चेंडूत 93 धावा कुटल्या. यासोबत कर्णधार शुभमन गिलने अँकरची भुमिका निभावत 39 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. गिलचे हे टी-20 कार्यकिर्दीतील तिसरे अर्धशतक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news