Shambhunagari Development Plan Pudhari
पुणे

Shambhunagari Development Plan: ५३७ कोटींचा शंभूनगरी विकास आराखडा ही अजितदादांची दूरदृष्टी

वढु बुद्रुक–केंदूर परिसराच्या विकासाला गती देणारा आराखडा; सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांच्या भावना व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

केंदुर: वढु बुद्रुक आणि परिसरात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा राबविण्यासाठी तब्बल ५३७ कोटींची तरतूद करुन आराखडा तात्काळ वास्तवात आणणे ही खरी उपमुख्यमंत्री अजितदादांची दूरदृष्टी व विकासदृष्टी आहे.दादांमुळे या कामाला किती वेगाने गती मिळू शकली याचा मी साक्षीदार आहे.

त्यामुळे पाबळ-केंदूर गट हा राज्यात आदर्श करण्याचे माझे स्वप्नही दादांच्याच भरोशावर पाहिले होते,मात्र त्यांच्या पश्चात आता हे स्वप्न सत्यात आणण्याचे आव्हान माझ्या पुढे असून दादांच्या प्रेरणेने मी ते स्विकारल्याची भावना पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल शिवले यांनी केंदूर (ता.शिरूर) येथे व्यक्त केली.

स्व.अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी केंदूर येथील ग्रामपंचायतपुढे सर्वपक्षीय भव्य सांत्वन सभा नुकतीच पार पडली. केंदूरच्या सरपंच अलका बापूसाहेब प-हाड यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभेचे आयोजन केले होते, या वेळी प्रफुल्ल शिवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सन २००३ मध्ये थिटेवाडी प्रकल्प उभारणी, सन २०१५ मध्ये केंदूर येथील संतश्रेष्ठ कान्हुराज महाराज तिर्थस्थळ दर्जा मंजुरी, केंदूर-पाबळ ही संयुक्त ६० कोटींची सोलर पाणी योजना मंजुरी, कोरेगाव भिमा-वढु बुद्रुक-वाजेवाडी-चौफुला-केंदूर-पाबळ रस्त्यासाठी मोठ्या निधीची मंजुरी हे सर्व पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांचेच योगदान असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाला सर्वपक्षीय सर्वस्तरांतील पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन रामभाऊ साकोरे यांनी केले.

दादांचे जागतिक शाळांचे स्वप्न पाबळ-केंदूर गटात मी पूर्ण करणार: शिवले

वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर राज्यात ५ हजार शाळा उभारणीसाठी अजितदादांनी सन २०१९ च्या अर्थसंकल्पात १५०० कोटींची तरतूद केली होती. तेच स्वप्न मी आता पाबळ-केंदूर गटातील १४ गावांतील ४४ जिल्हा परिषद शाळांच्या निमित्ताने पुर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूकीत उतरल्याचे प्रफुल्ल शिवले यांनी पत्रकारांना आवर्जून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT