Pune High Speed Rail Corridor: पुण्यासाठी आनंदाची बातमी; मुंबई व हैदराबादसाठी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मंजूर

केंद्रीय अर्थसंकल्पातून पुणेकरांना मोठा दिलासा; प्रवासाचा वेळ कमी होणार, विकासाला गती
Pune High Speed Rail Corridor
Pune High Speed Rail CorridorPudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्पातून पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी दोन महत्त्वाचे मार्ग थेट पुण्यासाठी असणार आहेत. यामध्ये पुणे-मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद-पुणे या दोन स्वतंत्र मार्गांचा समावेश आहे. या निर्णयाचे रेल्वे प्रवासीतज्ज्ञ आणि पुणेकरांकडून स्वागत करण्यात आले आहे. याबाबत रेल्वे प्रवासी ग््रुापच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, पुण्यासाठी हे अर्थसंकल्पातील सर्वांत मोठे यश आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद यासाठी स्वतंत्र कॉरिडॉर विकसित केल्यामुळे पुणे आता या दोन्ही प्रमुख शहरांशी अधिक वेगवान पद्धतीने जोडले जाईल. यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचेलच; शिवाय प्रवासाचा दर्जाही सुधारेल.

Pune High Speed Rail Corridor
Chakan Market Rates: चाकण कृषी बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक; लसणाचे दर कोसळले

वेळ वाचणार, वेग वाढणार

या नवीन हायस्पीड कॉरिडॉरमुळे पुणे ते मुंबई आणि पुणे ते हैदराबाद या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्याच्या रेल्वेमार्गावरील वाढता ताण आणि मर्यादित वेग, यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, नवीन स्वतंत्र ट्रॅकमुळे रेल्वेची गती वाढणार असून, याचा थेट फायदा लाखो नोकरदार आणि व्यावसायिकांना होणार आहे.

Pune High Speed Rail Corridor
Pune Flower Market Prices: मागणी घटल्याने गुलटेकडी फुलबाजारात दर निम्म्यावर

ठळक वैशिष्ट्ये

  • पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबादसाठी वेगळे कॉरिडॉर असतील.

  • पुण्याचा आर्थिक आणि औद्योगिक विकास, यामुळे अधिक वेगवान होईल.

  • हायस्पीड रेल्वेमुळे एकावेळी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू शकतील.

  • या प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होणार असून, भविष्यात रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news