पुणे : सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीमध्ये सुरू असलेल्या पाताळयंत्री कारभाराचे सूत्रधार संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख हेच असल्याचे पुरावे हाती आले आहेत. त्यांनी विश्वस्त रामाकांत लेंका यांची बदनामी करणारे पत्र अध्यक्षांना लिहिले. त्यात रानडेंचे गोडवे तर लेंका यांच्या बाबत बदनामीकारक उल्लेख आहे. हे पत्रच उघड झाले असून त्याची कल्पना खुद्द विश्वस्तांनादेखील नाही. संस्थेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघत असताना सचिव मिलिंद देशमुख हे कुलगुरू डॉ.अजित रानडे यांना सोबत घेऊन विकासाच्या नावाखाली आर्थिक लाभ उचलत आहेत.त्यांना अडसर वाटणारे विश्वस्त रमाकांत लेंका यांची बदनामी करणारे पत्र अध्यक्षांना लिहिले.
यावरून अध्यक्ष आणि सचिव यांचा हेतू किती पाताळयंत्री आहे हेच स्पष्ट होते. डॉ. रानडे यांनी स्वतःला कुलगुरू करवून घेण्यासाठी कुलपती डॉ. राजीव कुमार यांच्या कडून यूजीसीला काय माहिती पुरविली हे गूढ उमगले नाही. डॉ. अजित रानडे यांनी स्वतःची कोणतीच (बायोडाटा) माहिती बाहेर जाऊ नये यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाला बंदी घातली आहे. या बाबतचा खुलासा लवकरच होईल. मात्र या पत्रावरून देशमुख व दामोदर साहू हे आपल्या पदाचा गैरवापर इतर विश्वस्तांबाबत कसा करीत आहे हेच स्पष्ट होते.
विद्यमान धर्मदाय उपायुक्त राहुल मामु यांनी नुकतीच स्वयंप्रेरित चौकशी लावली त्यामुळे न्यायव्यवस्थेबद्दलचा विश्वास वाढला आहे. यामुळे हादरलेल्या विश्वस्तांच्या हालचाली वाढल्या. पुणे संस्थेचे मुख्यालय सोडून उत्तर प्रदेश येथील शाखेत बैठकीचे आयोजन केले आहे. यात 41ड बाबत 16 फेब्रवारी रोजी अध्यक्ष, सचिव व इतर विश्वस्त यांनाम्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढल्या आहेत.
इन्स्टिट्यूटच्या प्रा. काकाली मुखोपाध्याय यांचा राजीनामा डॉ. अजित रानडे यांनी स्वीकारून
स्वतःच्या कारनाम्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. सचिव मिलिंद देशमुख यांनी रानडे यांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न केला. यात मनोजकर ह्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्याला काढून टाकले. कारण देशमुख यांना दामोदर साहू यांचे अभय आहे.
सचिव मिलिंद देशमुख हे दामोदर साहू यांना इतर विश्वस्तबद्दल बदनामी करणारे पत्र लिहून पाठवत असल्याने दामोदर साहू हे अध्यक्षपदाचा वापर करून इतर विश्वस्तांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करून कोरम अभावी ठराव पास करून घेतात. डिसेंबर 2021 मध्ये उत्तराखंड येथे अशीच बैठक घेऊन अध्यक्ष आणि सचिव तसेच पी. के. द्विवेदी या वरिष्ठ सदस्यला सोबत घेऊन स्वतः च्या मुलांना आजीवन सदस्य करून घेता यावे असा हा डाव होता. मात्र त्यावर मिश्रा यांनी हरकत घेतली. यामध्ये धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केल्याने जुलै 2023 पासून मिश्रा यांच्या प्रकरणाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता.
प्रति, अध्यक्ष, श्री. दामोदर साहू
आणि सर्व सदस्य (दि. 07-12-2022)
सर,
आशा आहे की आपण सर्व चांगले करीत आहात. मी मुख्यालय, पुणे बाबत काही अपडेट्स शेअर करू इच्छितो. डॉ. अजित रानडे, कुलगुरू(जी.आय.पी.ई.) हे गोखले इन्स्टिट्यूट आणि सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या वाढीसाठी अनेक मार्गांनी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. गेल्या दशकांतील निरीक्षणानुसार ते गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जी.आय.पी.ई.) चे पहिले संचालक आहेत, ज्यांनी समाजाला एवढी मदत केली आहे. मला वाटते की संस्था आणि सोसायटी या दोघांनीही त्यांची इच्छा आणि प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे.त्यांची दूरदृष्टी यशस्वी करण्यासाठी त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. आपली कृतज्ञता दाखवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना पाठिंबा देऊन शक्य होईल त्या मार्गाने मदत करणे होय.
डॉ. अजित रानडे हे नागपूर शाखा, मुख्यालय पुणे (व्यावसायिक प्रकल्प), रानडे ट्रस्टच्या कल्याणकारी बाबी आणि तेथील हेरिटेज स्ट्रक्चर्समध्येदेखील लक्ष घालत आहेत.अलीकडेच श्री.अजित रानडे रमाकांत लेंका यांच्यात वाद झाले. तथापि, मला खात्री आहे की ते लवकरच सोडवले जातील. पुन्हा एकदा मी डॉ. रानडे यांना माझ्या शुभेच्छा देतो. सादर
मिलिंद देशमुख (प्रत रवानाः डॉ.अजित रानडे,कुलगुरु,जीआयपीई)
हेही वाचा