तळेगाव दाभाडे : येथील श्री विठ्ठल मंदिरास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, या मंदिरातून होत असलेले धार्मिक संस्कार आणि परंपरांचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे श्रीगुरू डॉ. किसन महाराज साखरे यांनी सांगितले. या वेळी छबूराव भेगडे व सौ. भेगडे, श्रीमती वाळुंज तसेच यतिन शहा आदींचा विशेष सत्कार साखरे महाराज यांचे हस्ते करण्यात आला. ह.भ.प. संपतराव गराडे यांनी पसायदान म्हटले. तसेच एकूण भक्ताकडून 60 किलो 550 ग्राम चांदी जमा झाली असून, मखरीसाठी 55 किलो 550 ग्राम चांदी वापरली आहे.
तर 5 किलो 500 ग्राम चांदी शिल्लक असल्याचे अहवाल वाचन करताना अनिल फाकटकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे स्वागत ह.भ.प. माऊली दाभाडे यांनी केले. तर श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकुश गुंड यांनी केले. आभार काशिनाथ निबळे यांनी मानले.
येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात चांदीचे मखर श्री चरणी अर्पण सोहळा ह.भ.प. साखरे महाराज यांचे हस्ते संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, संस्थानचे विश्वस्त व्यवस्थापक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा