Sago Pudhari
पुणे

Pune Sabudana Bhagar Prices: पुणे मार्केट यार्डमध्ये साबुदाणा-भगरच्या दरात वाढ; उपवास हंगामामुळे मागणी तेजीत

उत्पादन घटल्याने किमती वाढल्या; उन्हाळी बाजरी स्वस्त, तर अन्य भुसार मालाचे दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक अद्याप शहराबाहेर असल्याने आणि सध्या कोणताही मोठा सण-उत्सव नसल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात व्यवहार मंदावले आहेत. दरम्यान, गुजरातमधून उन्हाळी बाजरीची आवक सुरू झाल्याने तिच्या दरात किलोमागे एक रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, यंदा उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेमुळे साबुदाणा आणि भगरीच्या भावात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. मात्र शेंगदाणे, गोटा खोबरा, बेसन, विविध डाळी, गूळ, साखर, अन्नधान्य आणि नारळाचे दर स्थिर आहेत. डिझेल दरवाढ, खाद्यतेल कमी वापरण्याच्या आवाहनाचा तसेच भुसार बाजारातील बहुतांश वस्तूंवर लागू करण्यात आलेल्या एक टक्का युजर चार्जेसचा अद्याप बाजारातील व्यवहारांवर कोणताही ठोस परिणाम झालेला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) 4150-4200 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 2150-2600, पामतेल 2150-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4000, वनस्पती 2050-2550 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3650-4200, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4400-7400, एच.एम.टी. कोलम 5700-6000, लचकारी कोलम 6600-7100, चिन्नौर 6500-7000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3400-3700, महिको नं.2 3100-3300, गावरान 3000-3200, हायब्रीड 2850-3000रु. गूळ :- गूळ नं. 1 4650-4850, गूळ नं.2 4500-4600 गूळ नं.3 4300-4450, बॉक्स 4500-5500 रु.

डाळी:- तूरडाळ 10000-12700, हरभराडाळ 7300-7500, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7500-7600, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये:-हरभरा 7000-7500, हुलगा 5800-6700, चवळी 7800-9800, मसूर 7500-8200, मूग 9400-12500, मटकी गावरान 16000-16700, मटकी पॉलिश 8500, मटकी गुजरात 16000-17000, मटकी राजस्थान 7000-7500, मटकी सेलम 17200-18800, वाटाणा हिरवा 5200-5500, वाटाणा पांढरा 5000-5200, काबुली चणा 7400-10800 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6500, साबुदाणा नं.2 6000, साबुदाणा नं.3 5800 रु. वरई भगर :-15000-15200, सावा भगर 13500-14000 रु. गोटा खोबरे 37000-39000 रु. शेंगदाणा :- जाडा 11000-12500, स्पॅनिश12000-13000, घुंगरु 11200-12200 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु.

रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, बेसन:- (50 किलोस) 3900-4650 रु. मिरची: काश्मीरी ढब्बी 60000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 24000-26000, खुडवा गुंटूर 12000-13000, खुडवा ब्याडगी 16000-18000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850, मद्रास 4600-4800, पालकोल जुना 2100-2300, सापसोल 3500-5000 रु.

साबुदाणा, भगरच्या भावात वाढ

जून महिन्यापासून विविध उपवासांना सुरुवात होत असल्याने बाजारात साबुदाणा आणि भगरच्या मागणीत वाढ होत असून त्याचा परिणाम दरांवरही दिसून येत आहे. यंदा उत्पादन कमी झाल्याने दोन्ही जिन्नसांच्या किमती तेजीत असून आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. धान्य बाजारात सध्या साबुदाण्याची दररोज 50 ते 70 टन आवक होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साबुदाण्याचे दर वाढले आहेत. भगरच्या भावातही तेजीचे वातावरण आहे. भगरची दररोज 20 ते 30 टन आवक होत असून मागणी सातत्याने वाढत असल्याचे व्यापारी आशिष दुगड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT