पुणे: अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेनंतरच अचूक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अमलात आणावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया नजीकच्या आंबेडकर पुतळ्यापासून भव्य महामोर्चा काढण्यात आल्या. पक्षाचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ५९ जातींमधील नागरिक भर पावसात उत्साहाने या मोर्चात सहभागी झाले.
या मोर्चात पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल न्हावळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, बाळासाहेब भागवत, संगीता आठवले.
प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बौद्ध समाज आणि इतर अनुसूचित जाती जमातीमधील ऐक्य व्यक्त करणार्या घोषणा या मोर्चात देण्यात आल्या. अनुसूचित जातींतील ५९ समाज घटकांमध्ये सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची ठाम भूमिका आहे.