खोर/पाटस: रोटी (ता. दौंड) गावात महिलांचे जबरदस्तीने मुंडण करण्यात येत असून, त्यांना विद्रूप करण्यात येत आल्याचे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत ग््राामस्थ व शितोळे परिवाराने ठामपणे म्हटले आहे की, ही परंपरा कोणत्याही जबरदस्तीशिवाय स्वेच्छेने केली जाते. यामध्ये स्त्रीचा सन्मान राखला जात असल्याचे रोटी गावाने सांगत रविवारी (दि. 28) रोटी गावात रूपाली चाकणकर यांचा निषेध केला.
या प्रसंगी ग््राामस्थ सचिन शितोळे म्हणाले, रोटी येथील रोटमलनाथ मंदिराला 800 वर्षांचा इतिहास आहे आणि ‘जावळ’ प्रथा सुमारे 500 वर्षांपासून सुरू आहे. थोरल्या मुलाच्या जन्मानंतर मंदिरात मामाच्या मांडीवर बसवून विधी पार पाडला जातो. या वेळी आईचे देखील मुंडण केले जाते. मात्र, यात समाजाची किंवा मंदिर प्रशासनाची कोणतीही जबरदस्ती नसून ही श्रद्धा आणि परंपरेचा मुद्दा आहे. चाकणकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे समाजाची बदनामी झाल्याचा आरोप करीत ही पोस्ट हटवून माफी मागण्याची मागणी आम्ही करीत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील आम्ही चौकशीची मागणी करणार असून, महिलांच्या माध्यमातून निवेदन देणार आहे. आजही महिलांचा ठाम आवाज आहे की, जबरदस्ती नसून मुंडण करणे, हा आमच्या गावचा अभिमान आहे.
दौंड पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शितोळे, कुरकुंभ गावच्या पोलिस पाटील रेश्मा शितोळे, डॉ. पूजा शितोळे ॲड. संतोष शितोळे, राष्ट्रवादी कॉंग््रेासचे दौंड तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, वसंत साळुंके, राजवर्धन जगताप, मनोज फरतडे, साहेबराव वाबळे, अंकिता गरुड, योगेंद्र शितोळे यांनी देखील तिखट शब्दांत या प्रकाराचा निषेध नोंदविला.
रोटी गावात जबरदस्तीने महिलांचे मुंडण केले जात असल्याची तक्रार देवयानी मोरे व शितोळे परिवारातील काही महिलांनी माझ्याकडे केली होती. मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने दखल घेतली असून, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. मी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यावर ठाम असून, मला माफी मागण्याची गरजच नाही. वेळप्रसंगी न्यायालयात देखील हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात येईल.रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
एकूणच, रोटी येथील ऐतिहासिक परंपरेवर निर्माण झालेल्या वादळानंतर शितोळे परिवार आणि ग््राामस्थांनी स्पष्ट संदेश दिला आहे. परंपरेचा सन्मान राहील, जबरदस्ती नाही; परंतु बदनामीही सहन केली जाणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र शितोळे यांनी केले.
शितोळे घराण्याचा सन्मान कुणी डावलू शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे. कोणीही काहीही बेताल वक्तव्य करेल, याला आम्ही भीक घालणार नाही. शितोळे परिवार जिकडे जाईल तिकडे त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असणार आहे.रमेश थोरात, माजी आमदार, दौंड
आम्ही सर्व लढणाऱ्या भगिनी आहोत. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. प्रत्येक गावाला एक संस्कृती व परंपरा आहे. त्यानुसार परंपरा जोपासण्याचे काम हे रोटी गाव करीत आहे. एवढा अपमान होऊन देखील येथील महिलांनी कोणताही अपशब्द वापरला नाही. तिरुपती बालाजीच्या बाबतीत देखील हेच घडत आहे. हे प्रकरण न्यायालयात जरी गेले तरी आम्ही शितोळे परिवाराच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे असणार आहे.वैशाली नागवडे, प्रवक्त्या, राष्ट्रवादी काँग््रेास