पुणे

पिंपरी: पहिल्या पावसातच रस्त्यांची चाळण

अमृता चौगुले

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा : पहिल्या पावसातच कुदळवाडी मोई फाटा चिखली या रहदारीच्या रस्त्याची व कुदळवाडी चिखली प्राधिकरण पेठ क्र. 16 या अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागली.

देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष

मनपाच्या फ प्रभागातील स्थापत्य विभागाने मागील वर्षात येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण आणि संपूर्ण देखभाल दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अपघाताची भीती

कुदळवाडी ते मोई फाटा व चिखली प्राधिकरण ते चिखली या सवार्ंत जास्त रहदारीच्या आणि गजबजलेल्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे. या रस्त्यावर पेट्रोल पंप, पोलिस चौकी, किराणा दुकाने, हाऊसिंग सोसायट्या, बँक एटीएम, स्क्रॅप कलेक्शन दुकाने, वर्कशॉप, वजन काटा, हॉटेल्स आहेत. या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यामुळे दुचाकी घसरत आहेत.

रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

येथील दुरवस्था पाहता इथे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, यामुळे अपघाताचीही शक्यता वर्तविली जात आहे. चिखली कुदळवाडीतील या वर्दळीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी या रस्त्यांची पाहणी करून डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT