पुणे : वेळ नदीवरील बंधारे कोरडेच

पुणे : वेळ नदीवरील बंधारे कोरडेच

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  वेळ नदीवरील तळेगाव ढमढेरे परिसरातील बंधारे कोरडे पडले आहेत. त्यातच अद्याप या परिसरात पाऊसदेखील झालेला नाही. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने चासकमानचे पाणी वेळ नदीत सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वेळ नदीवरील तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ बंधारा, पांढरी वस्ती, सातपुते वस्ती, केवटे मळा व पुढील गावांचे बंधारे तसेच शिक्रापूर येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी या भागात पाऊस झालेला नाही. अजूनही उन्हाची तीव—ता जास्त आहे.

वेळ नदीवरील तळेगाव ढमढेरे परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रिकामे झाले आहेत. सदर बंधार्‍यावरून नदीकाठच्या गावांची तसेच छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. शेतकर्‍यांच्या सिंचन योजना आहेत. परंतु, त्या पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चासकमानचे पाणी तातडीने वेळ नदीतून सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news