Rickshaws
हेल्मेट परिधान न केल्याचा चक्क रिक्षाचालकाला दंड Rickshaw file photo
पुणे

Pune News| पुणे तेथे काय उणे! हेल्मेट परिधान न केल्याचा चक्क रिक्षाचालकाला दंड

पुढारी वृत्तसेवा

पुण्यात दुचाकीसोबत माणसाला टोइंग करून गाडीत चढविल्याचा, टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा, तर नुकताच वाहतूक पोलिसांवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या अजब घटना घडल्या असतानाच त्यात वाहतूक पोलिसांशी निगडित आणखी एका घटनेची भर पडली आहे.

पोलिसांनी वाहतूक एका रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंडाची नोटीस बजावली आहे. जर दंडाची रक्कम नाही भरली, तर तुमच्यावर न्यायालयात खटला भरला जाईल, असेही नोटिशीमध्ये सूचित करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांचा अशा प्रकारामुळे समाज माध्यमांवर हा प्रकार चांगलाच व्हायरल झाला आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न चांगला तापत असताना दुसरीकडे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी व नियम-अटी पाळल्या जाव्यात, यासाठी चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, असताना एका रिक्षाचालकाला हेल्मेट घातले नाही म्हणून दंडाच्या रकमेबाबत नोटीस पाठविण्यात आली.

तसेच, त्याला ही रक्कम न भरल्यास न्यायालयात खटला भरण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात दुचाकीवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात येतो. मात्र, रिक्षावर हेल्मेट नसल्याचा दंड ठोठावताना संबंधित कर्मचाऱ्याकडून असा प्रकार कसा घडला, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

याबाबत रिक्षाचालकाने लागलीच पुणे जिल्हा महाराष्ट्र वाहतूक शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) दत्तात्रय घुले यांना माहिती दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांचा हा गलथान प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात ही बाबत तांत्रिक चुकीमुळे झाली असण्याची शक्यता पाहता व न्यायालयात खटला जाण्याची शक्यता पाहता नोटीस काढणाऱ्या किंवा मेसेज पाठविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

मी रिक्षाचालक आहे. माझ्या रिक्षावर विदाऊट हेल्मेट गाडी चालवत असल्याचा व ५०० रुपये दंड पडल्याचा मेसेज आला. प्रत्यक्षात मेसेजमध्ये देण्यात आलेला नंबर हा रिक्षाचा होता. रिक्षावर हेल्मेट परिधान न केल्याचा दंड कसा म्हणून मीच आश्चर्यचकित झालो.
योगेश सोनावणे, रिक्षाचालक
SCROLL FOR NEXT