पुणे

पुणे : पालिकेतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची आवश्यकता : डॉ. नीलम गोर्‍हे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेमध्ये वर्षोनुवर्षे बहुतांश पदावर एकच अधिकारी कार्यरत राहतात. त्यामुळे, कामकाजाची गती मंदावलेली दिसून येते. राज्य सरकारच्या अधिकार्‍यांची बदली केली जाते. त्याचप्रमाणे राज्यातील महापालिकां मधील अधिकार्‍यांचीदेखील बदली करायला हवी, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. दरम्यान, अंतिम निर्णय हा नगरविकास खात्याचा असेल, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे झाले. त्याअनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी डॉ. गोर्‍हे यांनी संवाद साधला. या वेळी, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. गंभीर विषयांकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाही, असे दिसून आले.

यासंदर्भात व्यक्तिगत मत मांडताना डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, 'ाज्य सरकारच्या अधिकार्‍यांची बदली केली जात असते. परंतु, महापालिकेच्या अधिकार्‍यांची बदली केली जात नाही. यामुळे एकच अधिकारी अनेक दिवस एकाच खात्याचे, विभागाचे काम पाहत असतो. यात बदल होणे गरजेचे वाटते. एका महापालिकेतून दुसर्‍या महापालिकेत अधिकार्‍यांची बदली केली गेली पाहिजे. जेणेकरून या अधिकार्‍यांना अन्य महापालिका व तेथील नागरिकांच्या परिस्थितीचाही अंदाज येईल."

अधिवेशनाच्या कालावधीत महापालिकांच्या निवडणुका लवकर घेण्यासंदर्भात सर्व पक्षांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व
पक्षांचे नेते हे निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्याचे ठरले. त्यानुसार पुढील काळात सर्वच पक्षाचे नेते आयोगाची भेट घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT