१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावावा: पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi
PM Narendra Modi

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशवासियांनी येत्या 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. देशाचा राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्याचे व राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

घरावर तिरंगा लावल्यानंतर त्याचे छायाचित्र हर घर तिरंगा वेबसाईटवर अपलोड करावे, असे सांगून मोदी पुढे म्हणतात की, प्रत्येक भारतीय नागरिक तिरंगा ध्वजाशी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. देशाच्या विकासासाठी अधिक मेहनत करण्याची प्रेरणा राष्ट्रध्वज आपणास देतो. राष्ट्रध्वजासोबत घेण्यात आलेल्या 6 कोटी 14 लाख 54 हजार 52 सेल्फी वेबसाईटवर अपलोड झालेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षीच्या जुलै महिन्यात 'हर घर तिरंगा' मोहिमेची सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news