पुणे

खडकवासला धरणात ‘रेगाट्टा’; पाच दिवसांच्या उपक्रमात 90 संघ सहभागी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नौकायन प्रेमींसाठी रेगाट्टा हा उपक्रम सोमवारी (दि.5) खडकवासला तलावावर सुरू झाला. पुढील पाच दिवस चालणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन एनडीएचे डेप्युटी कमांडंट व मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डोगरा यांच्या हस्ते झाले.
एनडीएच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रेगाट्टा हा वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे.

पुढील तीन दिवसांत विविध प्रतिष्ठित संस्थांमधील 180 हून अधिक कुशल खलाशांचा समावेश असलेल्या 90 हून अधिक संघांचा यात सहभाग असेल. रेगाट्टा कॅडेट्स आणि सहभागींमध्ये खिलाडूवृत्ती, सांघिक कार्य आणि नेतृत्व गुणांना चालना देण्यासाठी एनडीएने हा उपक्रम सुरु केला आहे. या वेळी कमांडर अभिलाष टॉमी कीर्ती चक्र, नौसेना पदक (निवृत्त) यांचा सत्कार करण्यात आला. ते प्रतिष्ठित नौकायक आहे. त्यांनी गोल्डन ग्लोब रेस 2022 मध्ये दुसरे स्थान मिळविले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT