8 districts red alert
पुणे: राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून, आगामी चार दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 8 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ म्हणजे सावधानतेचा, तर 9 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून, काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंत अतिमुसळधार पाऊस होत आहे. मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाल्याने तो आता जोरदार बरसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हवेचे दाबही अनुकूल झाल्याने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला आहे. 25 ते 28 जून या चार दिवसांत राज्यात पावसाचे रौद्ररूप पाहावयास मिळू शकते. (Latest Pune News)
...असे आहेत अलर्ट (कंसात जुलैमधील तारखा)
रेड अलर्ट (200 ते 300 मि.मी.): दि. 25 जुलै: रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.
ऑरेंज अलर्ट (80 ते 199 मि.मी.): पालघर (26), ठाणे (25, 25), मुंबई (25), रायगड (26), रत्नागिरी (26, 27), सिंधुदुर्ग (25, 26), पुणे घाटमाथा (26, 27), कोल्हापूर घाटमाथा (25, 26), सातारा घाटमाथा (26, 27).
यलो अलर्ट (80 ते 99 मि.मी.): छ. संभाजीनगर (26), जालना (25, 26), परभणी (25, 26), बीड (25), हिंगोली (25, 26), नांदेड (25), अकोला (25 ते 28), अमरावती (25 ते 27), भंडारा (27), बुलडाणा (25, 26), चंद्रपूर (28), गडचिरोली (27), गोंदिया (26, 27), नागपूर (27), वर्धा (26), वाशिम (25, 26), यवतमाळ (25, 26).