पुणे

Pune crime News : पार्टीवरून घरी निघालेल्या तरुणीवर बलात्कार

अमृता चौगुले

पुणे : विमाननगरमधील एका कॅफेमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. दत्तात्रय खरात (वय 28, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 32 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफे आहे. तरुणी, तिची मैत्रीण, दोन मित्र गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी तेथे गेले होते. पार्टीचे दहा हजार रुपयांचे बिल झाले. तरुणीने डेबिट कार्डद्वारे बिल अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डच्या पिनमध्ये चूक झाल्याने बिल अदा होऊ शकले नाही. त्यानंतर उपाहारगृहातील व्यवस्थापक आणि कामगारांनी तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्याकडील दोन मोबाइल संच, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबिट कार्ड ताब्यात घेतले.

बिल भरल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करू, असे त्यांनी सांगितले. तिचे मित्र अगोदरच निघून गेले होते. त्यानंतर ती कॅफेबाहेर पडली. त्या वेळी खरात याने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला. तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन खराडी भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर त्याने बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी खरात याला अटक करण्यात आली. खरातसह तिघांवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT