पुणे

Rape Case | धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये बलात्कार; नंतर जबरदस्तीने गर्भपात

Laxman Dhenge

पुणे : तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार 2021 ते एप्रिल 2024 या कालावधीत कोरेगाव पार्क आणि विमाननगर येथील स्पा सेंटरमध्ये घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित 22 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. 25) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गजानन दत्ता आडे (27, रा. नांदेड) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी गजानन आडे कोरेगाव पार्क आणि विमाननगर येथे स्पा सेंटर चालवतो. पीडित तरुणी त्याच्या स्पा सेंटरमध्ये कामाला होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT