Water Tanker Pudhari
पुणे

Purandar Water Crisis: राखमध्ये पाणीटंचाई; टॅंकरवर ग्रामस्थांची तहान भागली

जलजीवन मिशनचे काम अपूर्ण; दगडूशेठ ट्रस्टकडून तातडीने पाणीपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

राख: राख (ता. पुरंदर) ग््राामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील लोकांची तहान टॅंकरने भागवली जात आहे. जलजीवन मिशनच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामामुळे येथील नागरिकांची तहान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या टॅंकरच्या माध्यमातून भागवली जात आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही उन्हाळ्याची चाहूल लागताच परिसरातील अनेक भागांत पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. राख (ता. पुरंदर) ग््राामपंचायत हद्दीतील चव्हाणवस्ती, पडळकर वस्ती, बिरोबावस्ती, कापडदरा येथे टॅंकर त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी येथील ग््राामस्थांमधून होत आहे. दरम्यान, ग््राामपंचायत राख यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांना या परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, असा पत्रव्यवहार केल्यानंतर तत्परतेने या परिसरात ट्रस्टने पिण्याच्या पाण्याचा टँकर मंगळवारी (दि. 24) सुरू केला.

जलजीवन मिशनचे काम अपूर्णावस्थेत

‌‘हर घर जल‌’ या जलजीवन मिशन अंतर्गत राख गावासाठी 12 कोटी 57 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही अद्यापपर्यंत येथील काम पूर्णत्वास गेलेले नाही. भीषण पाणीटंचाईकडे म्हणावे असे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे सद्यःस्थितीत रखडलेल्या जलजीवन मिशनच्या अर्धवट कामावरून निदर्शनास येत आहे. या गावात जलजीवन मिशनची कामे रडतखडत सुरू असून, ही कामे त्वरित पूर्ण होणे गरजेचे असल्याचे ग््राामस्थांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT