पुणे

Rain update: येत्या ३ दिवसात राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी : स्कायमेटचा अंदाज

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसांच्या सरी कोसळतील, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे ५ ते १५ जून या कालावधित मान्सूनने कोकण आणि महाराष्ट्र व्यापलेला पहायला मिळतो. पण या वेळी मान्सूनला थोडा उशीर होत आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

जून महीन्यातील पाऊसाचे प्रमाण

सध्या कर्नाटकच्या कारवार किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन झालेले आहे. ७ जूनला दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊसाचे प्रमाण थोडे कमी पहायला मिळेल. तसेच सांगली, सातारा आणि आसपासच्या परिसरातही पावसाच्या सरी कोसळतील, असे स्कायमेटने म्हटले आहे. ८ जूननंतर पावसाची तीव्रता वाढत जाईल आणि दक्षिण महाराष्ट्रातही पाऊस हजेरी लावेल. तर ९ जूनपासून विदर्भात पावसाचे आगमन होईल.

पण हा पाऊस मान्सूनचा नसून तो मान्सूनपूर्व आहे. तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असे स्कायमेटचे मत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT