मोठी पडझड झाल्याने कोकणात ताम्हिणी मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.  Pudhari photo
पुणे

Pune Rain Updates | पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट, आज शाळांना सुट्टी जाहीर

कार्यालये आणि इतर अस्थापनांनाही सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील काही भागात रेड अलर्ट (Pune Rain Updates) दिला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळांना (Pune schools closed due to rain) आज २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तसेच पावसाचा जोर लक्षात (Pune rain news) घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुट्टी देण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट (Pune red alert today) देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टी सुरु आहे. हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज गुरुवारी (दि.२५ जुलै) बंद ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पावसामुळे पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन

पुणे शहरातील शासकीय कार्यालयांना सुटी नाही. तर इतर आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुट्टी देण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग

तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरु आहे. (pune flood news) यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पुणे महापालिकेने ८ बोटी आणि बचाव पथके मदातकार्यासाठी नियुक्त केली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा करुन बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. (Pune Rains Updates)

वीर धरणाच्या सांडव्याद्वारे नदी पात्रात १३ हजार ९११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचा अंदाज आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT