पौड : ताम्हिणी घाटाजवळील आदरवाडी (ता. मुळशी) येथे पिकनिक पॉईट हॉटेलवर दरड कोसळली.पिकनिक पॉईट हॉटेलवर दरड कोसळली
पुणे
पुणे : हाँटेलवर दरड कोसळली, ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद
पुणे : हाँटेलवर दरड कोसळली, ताम्हिणी घाट रस्ता बंद
पौड : ताम्हिणी घाटाजवळील आदरवाडी (ता. मुळशी) येथे पिकनिक पॉईट हॉटेलवर दरड कोसळली. त्यामध्ये दोन जण हॉटेल खाली दबले गेले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.
दरड हॉटेलवर कोसळून आदरवाडी येथील पुणे ते दिघीबंदर या मुख्य रस्त्यावर आली. यामुळे कोकणात ताम्हिणी मार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली. पौडचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, पोलिस नाईक सिध्देश पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

