कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच 29 पर्यंत पाऊस; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी Pudhari
पुणे

Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच 29 पर्यंत पाऊस; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी

पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे

पुढारी वृत्तसेवा

Rain in Maharashtra

पुणे: राज्यातील काही जिल्ह्यातच 29 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि उत्तर महा?ाष्ट्रात तुलनेत पाऊस खूप कमी झाला आहे.

गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे. रविवारी बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना समावेश आहे. असाच पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. (Latest Pune News)

रविवारी राज्यात झालेला पाऊस.....

कोकण : मंडणगड, मोखेडा 250, जव्हार,कर्जंत 240, पोलादपूर, मुरबाड 220, माथेरान 210, महाड, पेडणे 180, तळा 170, माणगाव 160, म्हसळा, दापोली 140,अवळेगाव 130, सांगे, भिवंडी, वाकवली 120,मध्यमहाराष्ट्र: सुरगणा 60, धडगाव 50, तळोदा 32, नवापूर, र्त्यंबकेश्वर 30, अक्कलकुवा 29, ओझरखेडा, शहादा, हसूजल 26, एरंडोल 25, वेल्हे 24, मुल्हेर 23, महाबळेश्वर, भुसावळ 21, अकोले, चोपडा 19, राधानगरी 17,विदर्भः भामरागड 49, बल्लारपूर 47, चंद्रपूर 24, राजुरा 23,घाटमाथा: अंबोणे 45, ताम्हिणी 45,शिरगाव 35 वाणगाव 33, दावडी 25.

असे आहेत अलर्ट (तारखा)

कोकण: अतिमुसळधार (25 ते 30)

मध्य महाराष्ट्र: मुसळधार(26),हलका ते मध्यम (25,27,28,29,30)

विदर्भः मुसळधारः (25,26),अतिमुसळधारः(27 ते 30)

मराठवाडाः अत्यंत हलका (25 ते 30)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT