पुणे

पुणे: देशासाठी खेळणाऱ्या राधिकाला दिला एका दिवसात पासपोर्ट

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्‍तसेवा : प्रशासकीय कामकाजाबाबत नेहमीच नकारात्मक बोलले जाते. मात्र त्याच प्रशासनाने देशासाठी खेळणाऱ्या राधिकासाठी एका दिवसामध्ये पासपोर्ट उपलब्ध करून दिला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांना राधिकाला पासपोर्ट देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन एका दिवसामध्ये राधिकाला पासपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तात्काळ राधिकाची दखल घेऊन तिला पासपोर्ट मिळवा याकरिता प्रयत्न सुरू केले.

दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या सायकल स्पर्धेमध्ये सायकल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून राधिका दराडे आणि तिची मैत्रीण संस्कृती खेसे सहभागी यांची निवड करण्यात आली आहे. या दोघींच्याकडे पासपोर्ट नव्हता. त्यांना तात्काळ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण कोरियाला रवाना व्हायचे आहे. त्यांनी केलेली मागणी योग्य असल्याचे पाहून तात्काळ त्यांच्या दोघींच्या कागदपत्राची तपासणी पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांनी स्वतःच्या हाताने त्यांचा सन्मान करत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देत पासपोर्ट सुपूर्त केला.

मागील दोन दिवसापासून त्यांच्या आई-वडिलांना आपल्या मुलींची संधी हुकते का अशी धास्ती लागली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पासपोर्ट अधिकारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे या दोन्ही खेळाडूंना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. पासपोर्ट मिळाल्याचा आनंद त्या दोघींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.

राधिकावर शुभेच्छांचा वर्षाव 

सायकल फेडरेशन इंडियाच्या वतीने दक्षिण कोरिया स्पर्धेकरिता बारामती येथील राधिका दराडे हिची निवड करण्यात आली आहे. तिच्या वडिलांचा सायकल पंचर काढण्याचा व्यवसाय आहे. वडील संजय दराडे देखील अनेक स्पर्धेत सहभाग घेत आले आहेत. राधिकाच्या निवडीची बातमी समजतात खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT