पुणे

Pune News : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग : पुणे विद्यापीठाची घसरण, ’मुंबई’ची उंच उडी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जागतिक प्रतिष्ठेच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये (क्वॅकेरली सायमंड्स) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी 541 ते 500 या गटात असलेले विद्यापीठ यंदा 711 ते 720 या गटात ढकलले गेले असून, मुंबई विद्यापीठाचे स्थान जवळपास 500 स्थानांनी उंचावले आहे.

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जागतिक पातळीवर महत्त्वाची मानले जाते. त्यामुळे या क्रमवारीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असते. यंदा शाश्वतता, रोजगार निष्पत्ती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य अशा निकषांवर जगभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करून क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत पहिल्यांदाच चीनला मागे टाकून भारतातील सर्वाधिक उच्च शिक्षण संस्थांचा समावेश झाला. भारतातील 148 संस्था, तर चीनच्या 133 संस्था यादीत आहेत.

'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान यंदा घसरल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी 541 ते 500 या गटात विद्यापीठाचा समावेश होता तर यंदा 711 ते 720 या गटात आहे. आशिया खंडासाठीच्या क्रमवारीत विद्यापीठ 37 व्या स्थानी आहे. तर गेल्या वर्षी 1000 ते 1200 या गटात असलेल्या मुंबई विद्यापीठाने यंदा मोठी सुधारणा केली. यंदा मुंबई विद्यापीठाने 751 ते 760 या गटात स्थान प्राप्त केले आहे. तर आशिया क्रमवारीत विद्यापीठाने 67 वे स्थान मिळवले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT