अमृत भांडवलकर
सासवड : जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झाले. पुरंदरमधील चार गटांची आरक्षणे ही दोन सर्वसाधारणसाठी, तर एक सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला आहे. परिणामी, चारही गटांत प्रस्थापितांना आव्हान निर्माण झाले. यात राजकारणापासून अलिप्त राहिलेल्यांना संधी निर्माण झाल्याने प्रस्थापित अडचणीत आले आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातच मुख्य चुरस होणार असल्याने चौरंगी लढत निश्चित मानली जात आहे. याशिवाय शिवसेना (उबाठा), मनसे आणि आप या पक्षांकडून देखील निवडणुकीत रंगत येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. (Latest Pune News)
तालुक्यातील गराडे गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने दिग्गजांची संधी हुकली आहे. गटाचा विचार करता या गटावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. सध्या या गटावर भाजपचे बाबा जाधवराव व गंगाराम जगदाळे यांचे वर्चस्व आहे. काँग््रेासचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये गेल्याने या ठिकाणी भाजपला मोठी संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग््रेास देखील येथे चांगली लढत देऊ शकेल, असेही सांगितले जाते. या गटात शिवसेनेच्या ज्योती झेंडे या जिल्हा परिषद सदस्या आहेत. आमदार विजय शिवतारे गटाकडून त्यांना पुन्हा संधी मिळू शकते.
भाजपकडून पूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता काळे किंवा अनिता कुदळे रिंगणात येऊ शकतात. वीर गटाचा विचार करता या गटावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. हा गट सर्वसाधारण असल्याने शिवसेनेकडून दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, समीर जाधव तर भाजपकडून शैलेश तांदळे, पिनूशेठ काकडे, विठ्ठल मोकाशी तसेच राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून बबूसाहेब माहुरकर यांच्यात लढत रंगण्याची चिन्हे आहेत. या गटात भाजप ताकदीने उतरणार आहे. यासाठी भाजपने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे.
बेलसर गटाचा विचार करता या गटावर काँग््रेासचे प्राबल्य राहिले आहे. त्यानंतर पक्षबदलच्या वेगाने घडामोडी घडल्या आहेत. हा गट सर्वसाधारण झाल्याने राष्ट्रवादीचे दत्ता झुरंगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुदाम इंगळे, माणिक झेंडे पाटील चर्चेत आहेत. शिवसेनेकडून माणिक निंबाळकर, श्याम भगत, पोपट खेंगरे, तर भाजपाकडून ॲड. शिवाजी कोलते, नीलेश जगताप, गौरव कोलते, माऊली यादव यांची नावे चर्चेत आहे. या गटातील सर्वपक्षीय इच्छुकांचा भमनिरास झाला आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. या गटात विमानतळबाधित सात गावांतील मतदार कोणाच्या पाठीशी राहतात, यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
निरा-शिवतक्रार गट हा महिला राखीव झाल्याने या ठिकाणी इच्छुकांच्या पदरी निराशाच आली आहे. मात्र, इच्छुकांच्या घरातून महिलेला उमेदवारी मिळवता येत असल्याने निराशा झटकून ते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासकडून निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, भाजपकडून समाज्ञी लंबाते, सीमा धायगुडे, माधुरी दगडे, शिवसेनेकडून भारती म्हस्के, तेजश्विनी गडदरे, ज्योती भुजबळ हे संभाव्य उमेदवार आपले जातीचे दाखले व कागदपत्रांची जुळवणी करीत आहेत. हा जिल्हा परिषद गट मागील पंचवार्षिक अपवाद वगळता पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग््रेासचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार गटाकडून जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.