Crime News: कामावरून घरी निघालेल्या तरुणीची दगडाने ठेचून हत्या

उरुळी कांचन परिसरात खळबळ नागरिकांमध्ये भीती व संताप
Crime news
Crime news pudhari news network
Published on
Updated on

कोरेगाव मुळ : उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मेडिकलमध्ये काम करणारी केवळ 20 वर्षांची तरुणी आयुष्याच्या उमलत्या वयात निर्दयी हल्ल्याची बळी ठरली. कोरेगाव मुळ-प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर दगडाने हल्ला करून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. (Latest Pune News)

मृत तरुणीचे नाव पूनम विनोद ठाकूर (वय 20, रा. गगन आकांक्षा सोसायटी कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे आहे. ती उरुळी कांचन येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होती. दररोजप्रमाणे कामावरून घरी परतताना अज्ञातांनी तिचा मार्ग अडवून दगडाने तिच्या तोंडावर आणि डोक्यावर बेछूट प्रहार केला. या हल्ल्यात पूनम गंभीर जखमी झाली. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Crime news
Pune News: महापालिकेतील लेटलतिफांना बसणार चाप; बायोमेट्रिकसह 15 दिवसात यंत्रणा करणार अद्ययावत

मृत तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (वय 23) याने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.पोलिसांना घटनास्थळी पूनमची पर्स, चप्पल, पाण्याची बाटली आणि मोबाईल फोन आढळून आले आहेत. या वस्तूंवरून तिच्यावर हल्ला करण्यामागे चोरी, सूड किंवा वैयक्तिक वाद यापैकी कोणता हेतू असावा याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक भाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अमित सिदपाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपास, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना शोधमोहिमेसाठी रवाना केले आहे.

नराधमांना अटक करण्याची मागणी

एका निरपराध तरुणीचा एवढ्या निर्दयतेने खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, हा खून करणाऱ्या नराधमांना शक्य तितक्या लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news