पुणे

पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज : नो हाँकिंग डे निमित्त जनजागृती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार…ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका… नका वाजवू जोरात हॉर्न… आपली तब्येत राहील छान, हॉर्न नॉट ओके प्लीज…' अशा घोषणा देत पुणेकरांनी नो हाँकिंग डे अर्थात 'नो हॉर्न डे'च्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर चौकात जनजागृती केली. लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, पुणे पोलिस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकिंग डे अर्थात 'पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद' अशी संकल्पना राबवित जनजागृती करण्यात आली.

पुण्यातील विविध ठिकाणी 'नो हाँकिंग डे' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला. ज्येष्ठांसोबतच महाविद्यालयीन तरुण आणि पुणे वाहतूक पोलिसांनी यामध्ये सहभाग घेत 'पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका', असे सांगण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले. या वेळी पुणे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव, मॉडर्न महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र झुंजारराव, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लायन्स क्लब पुणे लोटसचे अध्यक्ष प्रसन्न पाटील, लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक, प्रा. पद्माकर पुंडे, संग्राम खोपडे आदी उपस्थित होते. मॉडर्न कॉलेजमधील एनएसएसचे विद्यार्थी जनजागृतीमध्ये सहभागी झाले होते. प्रा. पद्माकर पुंडे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT